शासकीय विश्रामगृहाला टाळे

कर्मचार्‍याअभावी बंद करण्याची नामुष्की
लोकप्रतिनिधी, अधिकार्‍यांची होणार गैरसोय

। म्हसळा । वार्ताहर ।
म्हसळा आणि श्रीवर्धन तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम खात्याचे अखत्यारीत असलेल्या शासकीय विश्रामगृहात कर्मचारी (चौकीदार)अभावी 3 ऑगस्टपासून टाळे लावण्यात आले आहे.

दरम्यान, याठिकाणी सेवेत असणारे कर्मचारी सेवानिवृत्त झाल्याने गेल्या तीन महिन्यांपासून या ठिकाणी सेवेत कर्मचारी नाहीत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांनी स्थानिक पातळीवर नियोजन करून विश्रामगृह सेवेसाठी तत्पर ठेवले होते; परंतु शासनाकडून अद्याप कर्मचारी प्राप्त न झाल्याने हे विश्रामगृह बंद ठेवावे लागले असल्याचे सार्वजानिक बांधकाम विभागाचे उपअभियंता प्रसन्नजीत राऊत यांनी सांगितले. विश्रामगृह बंद ठेवल्याने विविध पक्षाचे लोकप्रतिनधी, आमदार, खासदार, सभापती, शासकीय अधिकारी, कर्मचारी, स्वयंमसेवी संस्था या सर्वांची गैरसोय होणार आहे.

विश्रामगृहात कर्मचारी नेमणूक करण्यासाठी लेखी पत्र देण्यात आले आहे. कर्मचारी उपलब्ध होताच शासकीय विश्रामगृह त्वरित सुरु केले जाईल.

– प्रसन्नजीत राऊत, उपअभियंता, श्रीवर्धन



Exit mobile version