पनवेलमध्येे शासकीय योजनांचे शिबीर

। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल महानगरपालिकेच्या नगरसेविका डॉ.सुरेखा मोहोकर यांनी युवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सिद्धी क्लिनिक, स्वामी नित्यानंद मार्ग, पनवेल येथे योजना आपल्या दारी अंतर्गत शासकीय योजनांचे शिबीर आयोजित केले होते. या शिबिराचे उद्घाटन कोकण शिक्षक मतदार संघाचे आमदार बाळाराम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिराला उपस्थित राहून जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन केले.
यावेळी आ.बाळाराम पाटील साहेब, विरोधी पक्षनेता प्रीतम म्हात्रे, पनवेल अर्बन बँक संचालिका माधुरी गोसावी, नगरसेविका डॉ.सुरेखा मोहोकर, नगरसेविका कमल कदम, नगरसेविका सारिका भगत तसेच शेकाप पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. यावेळी वयाच्या 75 व्या वर्षी बि.ए.पदवी मिळविणार्‍या राजकुमार ताकमोडे यांचे व त्यांच्या पत्नीचे सत्कार करण्यात आले.

Exit mobile version