मुंबई | प्रतिनिधी |
राज्यातील सर्व सरकारी वाहनं इलेक्ट्रीक असणार आहेत. 1 जानेवारीपासून हा निर्णय लागू झाला आहे. तशी घोषणा राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी नववर्षाच्या सुरूवातीलाच केली आहे.
डिझेल-पेट्रोलवर चालणार्या वाहनांमुळे होणारे प्रदुषण रोखण्यासाठी हा निर्णय पर्यावरण खात्याकडून घेण्यात आला आहे . राज्यातील प्रदुषण रोखण्याठी पर्यावण मंत्रालयाकडून सध्या ठोस पावलं उचलण्यात येत आहे. मागील काही वर्षात पेट्रोल-डिझेलच्या गाड्यांमुळे प्रदूषणात मोठी वाढ झाली आहे. केंद्र सरकारकडूनही देशपातळीवरही प्रदुषण रोखण्यासाठी मोठे निर्णय घेण्यात येत आहेत.