| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते गोविंद झिमा शिंगाडे यांचे निधन झाले आहे. जुम्मापट्टी धनगर वाडा येथे राहणारे शिंगाडे हे वयाच्या 65 पर्यंत माथेरान येथे दूध घेऊन जायचे आणि संध्याकाळी नेरळ येथे दूध घेऊन जायचे. त्यांचा हा सर्व प्रवास बहुतेक वेळा पायीच असायचा. त्यामुळे गोविंदा शिंगाडे यांना माथेरानचे बदलाचे साक्षीदार समजले जात होते. नेरळ माथेरान घाटरस्त्याच्या दरम्यान असलेल्या जुम्मापट्टी धनगरवाडा येथे राहणारे गोविंद शिंगाडे हे दूध व्यवसाय करायचे. माथेरान डोंगरात राहणारे शिंगाडे हे वयाच्या 15 वर्षांपासून सकाळच्या वेळी जुम्मापट्टी येथून माथेरान आणि संध्याकाळी जुम्मापट्टी येथून नेरळ असा व्यवसाय करायचे. नेरळ माथेरान मिनीट्रेनच्या 70 वर्षांच्या बदलाचे साक्षीदार म्हणूनदेखील गोविंद शिंगाडे ओळखले जायचे. नेरळ ग्रामपंचायतीमधील सदस्य संतोष शिंगाडे हे त्यांचे पुत्र आहेत.







