| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
समाज कार्यात मोलाचे योगदान दिल्याबद्दल पेडली येथील गोविंद बाळाराम तळेकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला आहे. त्यांना समाज गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सुधागड तालुका मराठा समाजाचे अध्यक्ष धनंजय साजेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा नुकताच पार पडला. सुधागड तालुका मराठा समाज या संस्थेच्या कार्यकारिणीमध्ये संचालकपदी कार्यरत असताना गोविंद तळेकर यांनी समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी योगदान दिले आहे. केलेल्या समाजसेवेच्या बळावर संस्था दिवसेंदिवस अधिक जोमाने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करीत आहे. दसरा मेळावाचे औचित्य साधत सुधागड तालुका मराठा समाज या संस्थेच्यावतीने माजी संचालक व पदाधिकारी सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला. गोविंद तळेकर यांच्या समाज कार्याची दखल घेत त्यांना समाज गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.







