पुरूष, महिला गोविंदांचा कसून सराव
| रेवदंडा | प्रतिनिधी |
श्रावणातील गोकुळ अष्टमीच्या सण काही दिवसांवर येत असल्याने सर्वत्र गोंविदा पथकांचा दहीहंडी फोडण्याचा सराव जेाशात असल्याचे चित्र असून अलिबाग तालुक्यात वरसोली येथील जय भवानी गोंविदा पथका मध्ये पुरूष गोविंदा पथकासह महिलाचा गोविंदा पथका जोश्यात सरावात मग्न आहे.
उंच उंच दही हंंडी फोडण्याचे आकर्षण रायगड जिल्हात सुध्दा तालुकास्तरावर व ग्रामीण भागात जोरदार आहे. ठिकठिकाणी उंच उंच दहीहंडी नाक्यानाक्यावर पहावयास मिळते, या उंच दहीहंडी फोडण्यासाठी अनेक गोंविदा पथके परिश्रम घेतात, त्याचाच एक भाग म्हणून ज्या प्रमाणे शहरी भागात गोंविदा पथके गोविंदाच्या काही दिवस अगोदर सरावात सहभाग घेतात, तसेच जिल्हात सुध्दा तालुकास्तर व ग्रामीण भागातील गोंविदा पथके गोंविदापुर्व सरावात सहभागी झालेले दिसतात.
अलिबाग येथे सुध्दा अश्याच प्रकारच्या उंच उंच दहिहंडया गोंविदामध्ये पहावयास मिळतात, यामध्ये प्रशांत नाईक मित्रमंडळाची उंच दहीहंडी नावलौकिकास आहे, या उंच दहीहंडी फोडण्यासाठी अनेक गोंविदा पथके सामील होत असतात, वरसोली येथील जय भवानी गोंविदा पथक सुध्दा प्रतिवर्षी दहीहंडी फोडण्यासाठी प्रसिध्दीस आहे, वरसोलीच्या जय भवानी गोंविदा पथकाने सन 2019 साली प्रशांत नाईक मित्रमंडळाची दहीहंडी फोडून रूपये 1 लाख 11 हजार, 111 रूपये बक्षिसे रक्कमेचे बक्षिस प्राप्त केले होते.
या वर्षी सुध्दा वरसोलीत येथील जय भवानी गोंविदा पथकांची उंच दही हंडी फोडण्यासाठी कंबर कसली असून गोविंदा पुर्वी एक महिना अगोदर उंच दहीहंडीसाठी थर लावण्याचा सराव सुरू केला आहे. यावर्षी जय भवानी गोंविदा पथकांनी सहा थर लावून प्रात्यक्षीत केले असून आगामी गोंविदा मध्ये उंच दहीहंडी फोडण्यासाठी सज्ज असल्याचा इशारा दिला आहे. वरसोली येथील जय भवानी गोविंदा पथकांत महिलांच्या गोंविदा पथकांनी सुध्दा जोरदार सराव सुरू केला असून चार थर लावून प्रात्यक्षिक सुध्दा केले आहे.
193 जणांना पोलीसांचा दणका गोविंदा रे गोपाळा असा जयघोष करीत जिल्ह्यामध्ये पारंपारीक पध्दतीने गोपाळकाला निमित्त मिरवणूक काढली जाते. या मिरवणूकीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी रायगड पोलीसांनी कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. शांतता राखण्यासाठी आतापर्यंत 160 जणांना प्रतिबंधात्मक नोटीस देण्यात आली आहे. ज्यांच्याविरोधात यापुर्वी गुन्हे दाखल आहेत. त्यांची पार्श्वभूमीचा अभ्यास करून 30 जणांविरोधात अदखपात्र गुन्हे दाखल केले आहेत. हा सण उत्सव मंगलमय व आनंदमय वातावरणात साजरा करता यावा यासाठी दंगल नियंत्रण पथकासह होमगार्ड, राज्य राखीव दल, पोलीस मुख्यालयातील पोलीस अधिकारी, कर्मचारी, होमगार्ड जवानांची नियुक्ती करण्यासाठी पोलिसांनी तयारी सुरु केली आहे.