चौक येथे सरकारी भात खरेदीला शुभारंभ

परिसरातील शेतकरीर्‍यांना दिलासा
| रसायनी । वार्ताहर ।
खालापूर तालुक्यातील नेताजी सहकारी भात गिरणी येथे शासकिय आधारभूत किंमत नुसार भात खरेदी शुभारंभ व्हा. चेअरमन शरीफ भालदार यांच्या हस्ते करण्यात आला, त्यामुळे परिसरातील शेतकरीर्‍यांना दिलासा मिळाला आहे.

चौक येथील सहकारी भात गिरणीत संपूर्ण तालुक्यातून शेतकरी भात विक्रीस घेऊन येतात. शासनाने 7/12 उतार्‍यावर पीकपाणी लाऊन घेण्यासाठी येथील संचालक मंडळ यांनी शासकिय पातळीवर प्रयत्न केले आहेत. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी यांचा फायदा झाला आहे. चांगल्या प्रथम दर्जाचे भात 2060 व सर्व साधारण भात 2040 दराने शेतकरी यांच्याकडून खरेदी करण्यात येत आहे. ही खरेदी 30 जानेवारी 2023 पर्यंत सुरू आहे. शेतकरी यांनी येताना स्वच्छ व सुकलेला भात आनने, आधारकार्ड, पीकपाणी 7/12 उतारे सोबत बँक पासबुक घेऊन येणे गरजेचे आहे असे भालदार यांनी आवाहन केले आहे. या कार्यक्रमास संचालक नथुराम कांगे, सुदाम करपे, रघुनाथ फराट, धनंजय देशमुख, जयवंत पाटील यांच्यासह शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version