। खरोशी । वार्ताहर ।
पेण एज्युकेशन सोसायटीच्या भाऊसाहेब नेने महाविद्यालय येथे शैक्षणिक वर्ष 2022-23 मधील पदवीप्राप्त विद्यार्थ्यांचा ‘पदवीदान समारंभ’ मोठ्या उत्साहात पार पडला.
समारंभासाठी पे.ए.सो.चे आधारस्तंभ अॅड. बापुसाहेब नेने हे प्रमुख अतिथी म्हणुन उपस्थित होते. तसेच, अॅड. मंगेश नेने, बापुराव आठवले, डॉ.नीता कदम, श्रीराम दातार, विनायक गोखले, डॉ. सदानंद धारप, प्राध्यापक, पदवीप्राप्त विद्यार्थी व त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या समारंभात जवळपास 100 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली.
विद्यार्थ्यांनी समाजाप्रती असलेल्या आपल्या कर्तव्याचे प्रामाणिकपणे पालन करत, येणार्या निवडणूकीत सजग राहून मतदान करुन लोकशाही बळकट करण्यासाठी मोलाचा हातभार लावण्याचे आवाहन प्राचार्यांनी यावेळी केली. अॅड. बापुसाहेब नेने यांनी पदवीप्राप्त विद्यार्थ्यांचे कौतुक करत सध्याच्या स्पर्धेच्या युगात प्रत्येकाने स्वत: कठोर परिश्रम करत स्वत:चे वेगळे अस्तित्व निर्माण करण्याचा सल्ला विद्यार्थ्यांना दिला. तर, अॅड. मंगेश नेने यांनीही पदवी मिळविणे हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील अतिशय गौरवास्पद क्षण असुन पदवी म्हणजे करिअरला आकार देण्याची सुवर्णसंधी असल्याचे मत व्यक्त केले.