। आगरदांडा । वार्ताहर ।
मुरुड तालुक्यातील आठ ग्रामपंचायतीच्या रिक्त जागांसाठी 21 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. यामध्ये वावडुंगी,सावली,एकदरा,राजपुरी,मजगाव, उसरोली,चोरढे, कोर्लेई या आठ ग्रामपंचायतीच्या रिक्त असलेल्या 21 जागांचा समावेश आहे.
यासाठी दि. 30 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर मुरुड तहसीलदार कार्यालयात अर्ज स्वीकारले जाणार आहेत. छाननी 7 डिसेंबर रोज तर अर्ज माघारीचा दिवस 9 डिसेंबर हा आहे. अशी माहिती मुरूड तहसीलदार गोविंद वाकडे यांनी दिली आहे.