ग्रामपंचायत निवडणूक! जिल्ह्यात 39.83 टक्के मतदान

पनवेलमध्ये सर्वाधिक 74 टक्के मतदान

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

रायगड जिल्ह्यातील 16 ग्रामपंचायतीची निवडणूक आज होत आहे. यामध्ये अलिबागमध्ये 2, पनवेल 1, कर्जत 1, खालापूर 4, माणगाव 3, महाड 1 व पोलादपूर तालुक्यातील 4 ग्रामंपचायतींचा समावेश आहे.

जिल्ह्यातील एकूण 16 ग्रामपंचायतीच्या मतदान प्रक्रियेत सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत 39.83 मतदान झाले. यामध्ये अलिबाग 32.09, पनवेल 74.90, कर्जत 37.24, खालापूर 39.60, माणगाव 40.14, महाड 39.81, पोलादपूर 48.83 टक्के मतदान झाले. जिल्ह्यातील 16 ग्रामपंचायत हद्दीत 31 हजार 297 मतदार असून आत्तापर्यंत 12 हजार 467 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

Exit mobile version