पोलादपूर बाळासाहेबांची शिवसेना वरचढ
पोलादपूर तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकींची रणधुमाळी पहिल्या टप्प्यातील तुर्भे खोंडा, तुर्भे खुर्द, तुर्भे बुद्रुक आणि वझरवाडी या चार ग्रामपंचायतींच्या निवडणुकीने सुरू झाली. निवडणुकीमध्ये बाळासाहेबांची शिवसेनाकडे तीन सरपंच पदं आली असून महाविकास आघाडीनेही लोहारे पुलापलिकडे प्रवेश करण्यासाठी यश मिळविले आहे.
पोटल -महाविकास आघाडीची बाजी
कर्जत तालुक्यातील पोटल ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट या आघाडीची सत्ता आली असून पाली तर्फे कोथल खलाटी ग्रामपंचायतीमध्ये ग्राम विकास आघाडीची बिनविरोध सत्ता आली.
खालापूर – ठाकरे गटाचे वर्चस्व
खोपोली- शिवसेना महाविकास आघाडीचे वर्चस्व
चौकमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार रितू सुधीर ठोबरे यांनी बाजी मारली. आसरेमध्ये ठाकरे गटाचेच थेट सरपंच पद उमेदवार बळीराम जांभळे हे 755 मते मिऴवून विजयी झाले. लोधिवलीमध्येही ठाकरे शिवसेनेने थेट सरपंच पुजा नितीन तवले विजयी झाल्या. तुपगाव मध्ये भाजपचे सरपंचपदाचे उमेदवार रवींद्र लक्ष्मण कुंभार हे विजयी झाले.
श्रीवर्धन – आदगाव बिनविरोध
श्रीवर्धन तालुक्यातील आदगाव या एकमेव ग्राम पंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली आहे. मात्र सरपंच पदासाठीही नामनिर्देशपत्र न आल्याने ते पदही रिक्त राहिले आहे. सदस्यसंख्या 10 आहे, त्यातील सात सदस्यांची निवड बिनविरोध झाली आहे.