ग्राम स्वच्छतेबाबत ग्रामसेवकांनी दक्ष रहावे

| पनवेल | वार्ताहर |

ग्राम स्वच्छतेबाबत ग्रामसेवकांनी दक्ष राहणे गरजेचे आहे,असे प्रतिपादन आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शक जयपाल पाटील यांनी केले.

पनवेल पंचायत समितीच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी बीडीओ संजय भोसे, पोलीस निरीक्षक गणेश फडतरे, पत्रकार किरण बाथम, अ‍ॅड. दीपक पाटील, डॉ. एजाज अहमद उपस्थित होते.

प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास गणेश फडतरे यांनी पुष्प माला अर्पण करून शिबिराचे उद्घाटन केले. यावेळी पाहुण्यांचे पुष्प देऊन गटविकास अधिकारी संजय भोसे यांनी स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विस्तार अधिकारी अविनाश घरत यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस संविधानाचे वाचन करण्यात आले.

यावेळी संपूर्ण तालुक्यातील ग्रामसेवक 70 व 10 पंचायत समिती कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आपत्ती सुरक्षा मित्र विकास रणपिसे, भास्कर नवाळे, संतोष पवार यांनी खूप मेहनत घेतली. शेवटी आभार ग्रामसेवक एन. के. भगत यांनी मानले.

Exit mobile version