। रेवदंडा । प्रतिनिधी ।
मुरूड तालुक्यातील चोरढे गावातील रायगड जिल्हा परिषद शाळेत पालकांच्या व ग्रामस्थांच्या सहकार्याने मंगळवारी (दि.1) ग्राम स्वच्छता अभियान साकारण्यात आले होते. यावेळी सरपंच तृप्ती घाग व अध्यक्ष पची यांच्या मार्गदर्शनात शाळेचा परिसर, गावातील रस्ते, स्मशानभूमी व त्या बाजूचा परिसर, गावात वाढलेली छोटी झाडे-झुडपे काढून स्वच्छता करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांबरोबरच पालक व ग्रामस्थांनी श्रमदानात सहभाग घेतला होता. या स्वच्छता अभियानाला संदीप घाग, तृप्ती घाग, ऋत्विक घाग, रवींद्र भोपी, सुरेश तांबडे, सुनील घाग, लक्ष्मण काचारे, हेमंत दूकले, नितेश घाग, प्रमोद चोरडेकर, वैष्णवी आमलिकर, माधुरी शेडगे, मीनाक्षी घाग, गंगाराम भोईर, जनी पाटील, विद्या शेडगे, स्वाती टावरी, रेणुका घाग, जयश्री पंची, हिरा भोईर आदींनी सहकार्य केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संगीता भगत, विजय जाधव, राजेंद्र नाईक, रमेश सुभेदार, प्रतिभा वर्तक, इर्शाद बैरागदार, जयश्री पची यांनी नियोजन केले होते.