ग्रामसेवक आणि ग्रामविकास पदे रद्द होणार

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
ग्रामसेवक आणि ग्रामविकास आधिकारी ही पदं लवकरच रद्द होणार आहेत. याऐवजी पंचायत विकास अधिकारी हे एकच पद निर्माण केले जाईल. यासंबंधीची मागणी ग्रामसेवक संघटनेकडून अनेक दिवसांपासून होत होती. त्यानुसार, राज्य सरकारनेदेखील ही पदे रद्द करून एकच पद तयार करण्यासाठीची तयारी सुरु केली आहे. नाशिक येथील विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेसाठी यासाठीची समिती नेमण्यात आली आहे. रद्द झालेल्या दोन्ही पदांची वेतनश्रेणी, पदोन्नती आदी बाबींचा सविस्तर अभ्यास या समितीतर्फे केला जाईल आणि त्यानुसार नवीन पदासाठीचे नियम ठरवले जातील. समितीने सहा महिन्यांच्या आता अहवाल सादर करावा, अशा सूचना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिल्या आहेत.

ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी पद रद्द करून नवे पद निरमाण करण्याची आवश्यकता आणि त्याची कारणमीमांसा करण्याची जबाबदारी या समितीवर देण्यात आली आहे. तसेच ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवक यांची स्वतंत्र वेतनश्रेणी असल्याने एकच पद निर्माण केल्यास अनुज्ञेय वेतनश्रेणीचा अभ्यास केला जाईल. तसेच वेतन, वेतन श्रेणी, कालबद्ध पदोन्नती, वित्तीय परिगणना आणि इतर बाबींचा अभ्यास करून शासनाला सहा महिन्याच्या मुदतीत अहवाल सादर करणार आहे. समितीने सहा महिन्यांच्या आता अहवाल सादर करावा, अशा सूचना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिल्या आहेत.

Exit mobile version