कर्जत नगरपरिषदेच्या विषय समित्यांवर महायुती

| कर्जत | प्रतिनिधी |
कर्जत नगरपरिषदेच्या विषय समित्यांची निवड करण्यात आली आहे. या चारही समित्यांवर शिवसेना-भाजप-आरपीआय महायुतीचे सभापती विराजमान झाले असून, महायुतीने आपले सिद्ध केले आहे. शुक्रवार, दि. 10 फेब्रुवारी रोजी नगरपरिषदेच्या सभागृहात विषय समित्यांच्या निवडीसाठी पीठासीन अधिकारी म्हणून कर्जतचे तहसीलदार डॉ. शीतल रसाळ यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. निवडणूक कामकाजकामी सहाय्यक पीठासीन अधिकारी मुख्याधिकारी वैभव गारवे यांनी सहकार्य केले. नगर परिषदेमध्ये 18 नगरसेवक आहेत, त्यापैकी 10 नगरसेवक शिवसेना-भाजप-आरपीआय तर 8 नगरसेवक राष्ट्रवादी-मनसे-स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टी-शिवराय भिमराय क्रांती संघटना या महाआघाडीचे आहेत.

स्वच्छता वैद्यक व सार्वजनिक आरोग्य समिती पदसिद्ध सभापती उपनगराध्यक्ष-अशोक ओसवाल, (पदसिद्ध) सदस्य-राहुल डाळींबकर, नितीन सावंत, पुष्पा दगडे, उमेश गायकवाड. पाणीपुरवठा व जलनि:सारण समिती सभापती-वैशाली मोरे, सदस्य-संचिता पाटील, बळवंत घुमरे, शरद लाड, सोमनाथ ठोंबरे. वीज, सार्वजनिक बांधकाम, शहर विकास समिती सभापती-विवेक दांडेकर, सदस्य-प्राची डेरवणकर, स्वामिनी मांजरे, सुवर्णा निलधे, ज्योती मेंगाळ. महिला व बालकल्याण समिती सभापती-विशाखा जिनगरे, उपसभापती- संचिता पाटील, सदस्य-स्वामिनी मांजरे,भारती पालकर, मधुरा चंदन (पाटील). स्थायी समिती पदसिद्ध सभापती-अध्यक्ष सुवर्णा जोशी, सदस्य – अशोक ओसवाल, वैशाली मोरे, विवेक दांडेकर, विशाखा जिनगरे.

Exit mobile version