। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील जय हनुमान क्रीडा मंडळ बहिरोळे आयोजित जय हनुमान चषक 2022 या भव्य क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवारी (दि.7) शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेते व रायगड बाजारचे चेअरमन नृपाल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी मापगावचे माजी उपसरपंच अशोक नाईक, विजय भगत, जगन्नाथ पाटील, वजिर कुर तसेच स्थानिक ग्रामस्थ, मंडळाचे सर्व खेळाडू व पदाधिकारी तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सर्वखेळाडूंना युवा नेते नपाल पाटील यांनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले. या प्रसंगी मंडळाच्यावतीने नृपाल पाटील यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच अशोक नाईक व अन्य मान्यवरांचा आयोजकांमार्फत सत्कार करण्यात आला. ही स्पर्धा दोन दिवस खेळवण्यात येणार असून जिल्ह्यातील नामवंत संघ सहभागी झाले आहेत. स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविणार्यास 1 लाख रूपये, द्वितीय क्रमांकास 50 हजार रुपये तसेच गोलंदाज, फलंदाज, मालिकावीर यांना सुद्धा आकर्षक बक्षिस देण्यात येणार आहेत.







