। उरण । वार्ताहर ।
वशेणी इतिहास संपादकीय मंडळाने 2018 पासून अनेक छोटे छोटे उपक्रम राबवले आहेत. उपक्रम जरी छोटे असले तरी समाजाला कोट्यावधीचा आनंद देण्याचे काम वशेणी इतिहास संपादकीय मंडळ करत असते. गौरवउद्गगार उरण पंचायत समितीच्या सभापती समिधा निलेश म्हात्रे यांनी वशेणी येथे संपन्न झालेल्या पथदिवे प्रकाशीत करण्याच्या कार्यक्रमात काढले. वशेणी इतिहास संपादकीय मंडळाकडून नवोदय परिक्षेत यश संपादन मृणल पाटील, पिरकोन गावच्या तलावात बुडणा-या महिलांचे प्राण वाचवणार्या प्रतिक पाटील, अधिकार पाटील यांना शौर्य सन्मान करण्यात आला. तसेच आवरे पंचायत समिती गणातून प्रथमच समिधा निलेश म्हात्रे यांची सभापती पदावर बिनविरोध निवड झाल्याने त्यांचाही मंडळाकडून भव्य सन्मान करण्यात आला. यावेळी वशेणी गावचे सरपंच जीवन गावंड, निलेश म्हात्रे, संदेश गावंड, रविंद्र गावंड, बी.जे. म्हात्रे, अनंत तांडेल, जगन्नाथ म्हात्रे, बळीराम म्हात्रे, नरेश पाटील ,घनश्याम पाटील, गणेश खोत, पराग पाटील, अनंत पाटील, महेंद्र पाटील , सुनिल ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते.







