पॅरिस ऑलिम्पिकचे शानदार उदघाटन

भारतीय खेळाडूंनी वेधले लक्ष, सनी नदीचे पात्र झगमगले

| पॅरिस | वृत्‍तसंस्था |

बहुप्रतिक्षित पॅरिस ऑलिम्पिक 2024ची सुरुवात शानदार उदघाटन सोहळ्याने झाली. या ऐतिहासिक सोहळ्यात 206 एसोसिएशन आणि विविध देशांचे 10,500 खेळाडू सहभागी झाले. हा सोहळा पाहण्यासाठी सीन नदीच्या काठावर 3 लाखांहून अधिक प्रेक्षक विक्रमी संख्येने उपस्थित होते. पॅरिस ऑलिम्पिकचा उदघाटन सोहळा भारतीय वेळेनुसार रात्री उशिरा सीन नदीच्या काठावर आयोजित करण्यात आला. ग्रीक संघाने प्रथम बोटीतून ऑलिम्पिक समारंभात प्रवेश केला. ग्रीक खेळाडूंचा उत्साह शिगेला पोहोचला होता.

एकापेक्षा एक मनमोहक दृश्य या उदघाटन सोहळ्यादरम्यान पाहायला मिळाली. भारतीय संघाची महिला ध्वजवाहक दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधू आणि अनुभवी टेबल टेनिसपटू अचंता शरथ कमल ध्वजवाहक होते. खेळाडूंसाठी उदघाटन समारंभाचे किट डिझायनर तरुण ताहिलियानी यांनी डिझाइन केले होते. भारत परेडमध्ये 84व्या क्रमांकावर होता. या उदघाटन सोहळ्यादरम्यान पॅरिसमधील संस्कृती आणि फ्रेंच संस्कृतीचे प्रदर्शन पाहायला मिळाले.
बहुप्रतिक्षित पॅरिस ऑलिम्पिक 2024 चा उदघाटन सोहळा पॅरिसमधील सेन नदीवर पार पडला.

भारतीय खेळाडू पारंपरिक पोशाखात 
ऑलिम्पिक उदघाटन सोहळ्यात भारतीय खेळाडूंचा संघ 84 व्या क्रमांकावर आला. दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेती बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधू आणि अनुभवी टेबल टेनिसपटू अचंता शरथ कमलनं भारताचा ध्वज फडकावला. भारतीय खेळाडूंनी यावेळी पारंपरिक पोशाख परिधान केला. यावेळी पीव्ही सिंधूंसह भारताच्या महिला खेळाडूंनी साडी परिधान करत सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे. या बोटीवर भारतासह इंडोनेशिया आणि इराणचे ऑलिम्पिक संघही उपस्थित होते.
Exit mobile version