। उरण । प्रतिनिधी ।
दिवाळीनिमित्त रंगावली कलादर्शन उरण आणि लायन्स क्लब ऑफ उरण यांच्या संयुक्त विद्यमाने उरण शहरातील एन.आय. हायस्कूल येथे भव्य रांगोळीचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन शनिवारी (दि.2) एन.आय. हायस्कूलचे चेअरमन सदानंद गायकवाड, लायन चंद्रकांत ठक्कर, संजीव अगरवाल यांच्या हस्ते करण्यात आले. हे रांगोळी प्रदर्शन दिनांक 9 नोव्हेंबरपर्यंत सकाळी 10 ते दुपारी 1 तर सायंकाळी 4 ते रात्री 9 वाजेपर्यंत विनामूल्य पाहता येणार आहे.
या प्रदर्शनात थ्रीडी रांगोळी, व्यक्तीचित्र, निसर्गचित्र अशा विविध प्रकाराच्या रांगोळ्या काढण्यात आल्या आहेत. नंदकुमार साळवी, दर्शन पाटील, सिद्धार्थ नागवेकर, नवनित पाटील, सत्या कडू, संतोष पाटील, राजेश नागवेकर, स्वप्नाली मणचेकर, ध्रुव म्हात्रे, वैष्णवी जाधव आदि कलाकांरानी उत्कृष्ठ असे रांगोळी काढून प्रेषकंची मने जिंकली आहेत. यावेळी रांगोळी कला बघण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. तसेच, कलाकारांची कला जनतेसमोर यावी, कलाकारांच्या कलागुणांना वाव मिळावी आणि दिवाळीमध्ये नागरिकांना रांगोळी कलेचा आनंद लुटता यावा या दृष्टीकोनातून उरणमध्ये रांगोळी प्रदर्शन भरविण्यात आले आहे. तसेच, जास्तीत जास्त नागरिकांनी हे रांगोळी प्रदर्शन आवर्जुन पहावे, असे आवाहन नंदकुमार साळवी, राजेश नागवेकर यांच्यासह अन्य कलाकारांनी केले आहे.