उरण येथे भव्य वृक्षारोपण कार्यक्रम

। उरण । वार्ताहर ।

कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने प्राचार्य के.ए. शामा यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून उरण रेल्वे स्टेशन, भाग्यलक्ष्मी हरितक्रांती संघ व नागनाथ गुरप्पा कुठार यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

एक झाड आईसाठी या उपक्रमांतर्गत महाविद्यालयाच्यावतीने उरण रेल्वे स्टेशन परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केला गेला. नागनाथ कोठार व प्रा. डॉ.एच.के.जगताप यांच्या नियोजन व परिश्रमातून हा वृक्षारोपण कार्यक्रम यशस्वी झाला.

Exit mobile version