। पनवेल । प्रतिनिधी ।
पेण तालुक्यातील कासू येथील शारदा विद्या मंदिराच्या 1983 च्या एसएससी बॅचच्या विद्यार्थी विद्यार्थिनींचा स्नेहमेळावा अलिबाग तालुक्यातील हेमनगर येथील गार्डन अँड रिसॉर्ट येथे संपन्न झाला. यावेळी कासू शाळेतून दहावी पास होऊन गेलेले विद्यार्थी जवळजवळ 41 वर्षांनी एकत्र आले. विशेष म्हणजे रिसॉर्टचे मालक दामोदर केणी हेदेखील या दहावीच्या बॅचचे विद्यार्थी आहेत. त्यामुळे त्यांच्या इच्छेखातर या कार्यक्रमाचे आयोजन त्यांच्याच रिसॉर्टमध्ये करण्यात आले होते. या स्नेह मेळाव्यासाठी दामोदर केणी, प्रवीण जोशी, प्रदीप तांडेल, दिव्या तांडेल, गणेश म्हात्रे, प्रमोद काकडे, वासुदेव म्हात्रे, तुकाराम नाईक, लक्ष्मण नाईक, गजानन म्हात्रे, रुक्मिणी बोरकर, कमलाकर मोकल, नरेंद्र नाईक, सदानंद तांडेल, सुरेखा पाटील तसेच कुटुंबातील अन्य नातेवाईक यावेळी उपस्थित होते.