आजी-आजोबा आनंद मेळावा

। महाड । प्रतिनिधी ।

संस्कार विद्यालयाच्या पूर्व प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांच्या आजी आणि आजोबांना बोलावून गुरुवारी (दि.29)रोजी त्यांचा आनंद मेळावा घेण्यात आला. आजच्या धावपळीच्या युगात शिक्षणासाठी पालकांना मूळ गावापासून दूर जावे लागते व अशा वेळेस आपल्या आजी आजोबांपासून नातवंडे दूर राहिल्याने त्यांना त्यांच्या प्रेमाला, संस्काराला मुकावे लागते. आणि म्हणूनच संस्कार धाम विद्यालयामध्ये आजी-आजोबा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून लहान मुलांच्या मनात आपल्या आजी-आजोबांविषयी असणारे प्रेम, माया आपुलकी मुलांच्या सादर केलेल्या कवितेतून, भाषणातून दिसून आली. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षिका गीतांजली साळवी या उपस्थित होत्या. त्यांनी आजच्या या धावपळीच्या युगात नातवंडांसाठी आजी-आजोबा किती महत्त्वाचे आहे हे सर्व आजी आजोबांना पटवून दिले व आजी आजोबांवर स्वतःच रचलेली कविता सादर केली.

Exit mobile version