। कोल्हापूर । वृत्तसंस्था ।
महात्मा गांधी यांचे नातू अरुण गांधी यांचे आज मंगळवारी (दि.2) अल्पशा आजाराने कोल्हापूर येथे निधन झाले. ते 89 वर्षाचे होते. त्यांच्या पार्थिवावर आज कोल्हापुरात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, असे त्यांचे पुत्र तुषार गांधी यांच्याकडून सांगण्यात आले.
अरुण मणिलाल गांधी हे महात्मा गांधींचे दुसरे पुत्र मणिलाल गांधी यांचे पुत्र. त्यांचा जन्म 14 एप्रिल 1934 रोजी दक्षिण आफ्रिकेतील डर्बन येथे झाला. अरुण गांधी यांनी काही पुस्तके लिहिली आहेत. त्यापैकी द गिफ्ट ऑफ अँगर: अँड अदर लेसन फ्रॉम माय ग्रँडफादर महात्मा गांधी हे प्रमुख आहेत.