। श्रीवर्धन । प्रतिनिधी ।
रानवली ग्राम पंचायतीच्यावतीने बिनविरोध निवड झालेल्या सरपंच, उप सरपंच व सर्व सदस्यांचा शाल-पुष्पगुच्छ देऊन सत्कार व नागरिकांचा कृतज्ञता सोहळा पंचायतीच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला होता. या समारंभास सरपंच सुरेश मांडवकर, राजू जाधव, उपसरपंच अताउल्ला जालगावकर, दत्ताराम डोईफोडे, अब्दुल रौफ खान, सुजित तांदळेकर, आयुबखान पठाण, शिगवण गुरुजी, अन्वर खान, विठोबा हावरे, मुकुंद जाधव, लियाकत विजापुरी, एचडीएफसी बँकेचे पवार, नूतन पंच ऋतुजा हावरे आदिंनी आपले विचार व्यक्त केले. बँकेतर्फे सरपंच मांडवकर यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी राजू जाधव यांच्या कन्या व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका गावी सरपंच म्हणून बिनविरोध निवडून आलेल्या विशाखा राजू जाधव यांचाही सत्कार करण्यात आला. या आनंददायी सोहळ्यात गावांतील सर्व समाजांतर्फे ग्रामपंचायतीच्या नूतन सदस्यांचा व सर्व समाज प्रमुखांचाही कृतज्ञता सत्कार करण्यात आला.







