| खोपोली | प्रतिनिधी |
खोपोली नगरपालिकेच्या कर्मचार्यांना दिवाळी सणानिमित्ताने सानुग्रह अनुदानात तीन हजाराने वाढ करण्यात आली आहे. 24 हजार 500 रूपये मंजूर करण्यासाठी भारतीय कामगार कर्मचारी महासंघाला यश आल्याबद्दल कर्माचार्यांनी पालिकेचे प्रशासक, मुख्याधिकारी अनुप दुरे आणि कामगार नेते नगरसेवक किशोरजी पानसरे यांचे अभार व्यक्त केले.
वाढती मगाई बघता येणारा दिपावली सण पालिकेच्या कामगार,कर्मचारी आणि अधिकार्यांचा आर्थिक मंदीत जावू नये यासाठी भारतीय कामगार कर्मचारी महासंघाचे सरचिटणीस कामगार नेते आमदार भाई जगताप यांच्या नेतृत्वाखाली सोमवार, दि.17 ऑक्टोबर रोजी मुख्याधिकारी तथा प्रशासक अनुप दुरे यांच्या दालनात कामगार नेते नगरसेवक किशोर पानसरे यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती.
याप्रसंगी कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे, कार्याध्यक्ष विनोद सोनावणे, उपाध्यक्ष संतोष सोनावणे, सचिव विठोबा म्हात्रे, उपसचिव रमेश जंगम, खजिनदार चंद्रकांत शिंदे, उपखजिनदार सुनील खंडागळे, ऑडिटर संतोष नघवरे, उपऑडिटर लक्ष्मण वाघमारे, प्रमुख सल्लगार अशोक पवार, दिपक जांभुळकर, सुदेश खांबे, विजय वाघमारे, योगेश यादव, गुणाजी गायकवाड, मंगेश गायकवाड, महादू साळुंखे, राहुल महाडिक, दशरथ जाधव, हिरामण कांबळे, श्री बनेश गायकवाड, दिपक पाचारणे, शशिकांत सितकर, अमर किर्वे, विनोद सोळंकी, सुभाष जाधव, प्रसाद थवई, राजेश पाटील, श्रीकांत कांबळे, गणेश चौधरी,श्रीमती अरुणा मोरे, संगीता सोळंकी, सुजाता गायकवाड उपस्थित होते. दरवर्षापेक्षा मोठी वाढ मिळावी यासाठी चर्चा केल्यानंतर मागील वर्षी 21 हजार 500 पेक्षा सानुग्रह अनुदानात 3 हजाराने वाढ करीत 24 हजार 500 रूपये मंजूर करण्यात आले आहे