संगीत जगताची मोठी हानी;साधना सरगम

। मुंबई । वृत्तसंस्था ।
संध्यापर्वातली वैष्णवी असा ज्यांच्या उल्लेख कवी ग्रेस करतात त्या भारतरत्न लता मंगेशकर यांचे वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले. लता दीदींच्या निधनाने संपूर्ण देश दु:खी झाला आहे. कलासृष्टीतील कलाकार आणि गायक, संगीतकार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

कुठेतरी आशा होती की, त्या बर्‍या होतील, पण तसे झाले नाही. संगीत जगताची मोठी हानी आहे. मंगेशकर कुटुंबीयांना एवढा मोठा आघात सहन करण्याची शक्ती देव त्यांना देवो. त्यांचा सूर, त्यांची गाणी अमर आहेत. त्यांना भेटल्यानंतर मी स्वतःला विसरुन जायचे. त्यांनी मला खूप आशीर्वाद दिला आहे. – साधना सरगम, गायिका

Exit mobile version