महाशिवरात्रौत्सवाची जय्यत तयारी

| म्हसळा | वार्ताहर |

दक्षिण रायगडातील निसर्गाचे सानिध्यात वसलेल्या म्हसळा तालुक्यातील म्हसळा शहरात महेश्वर, देवघरात अमृतेश्वर, घूम गावात घुमेश्वर, तोंडसुरे- जंगमवाडी येथे वरदशंकर आणि वारळ या ठिकाणी इतिहास कालीन स्वयंभु श्री शंकराचे देवस्थान आहेत. या स्वयंभु देवळात स्थानिक ग्रामस्थ मंडळ ट्रस्ट सालाबाद प्रमाणे महाशिवरात्रीनिमित्त मोठ्या उत्साहात पुजापाठ, आरती, भजन कीर्तन, दिंडी सोहळा, प्रसाद आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून महाशिवरात्रौत्सव साजरा करतात. यावर्षी शुक्रवारी (दि. 8) मौजे देवघर येथे श्री दत्तात्रय देव व अमृतेश्वर मंदिर ट्रस्टतर्फे अमृतेश्वर मंदिरात अभिषेक, महाआरती, दिंडी सोहळा आणि 11-00 वाजता भाविकांचे मनोरंजनार्थ श्री कालभैरव प्रासादिक भजन मंडळ काळसुरी येथील बुवा जगदीश घोसाळकर आणि मु.लहाणे ता.माणगाव येथील तुकाराम बुवा महाडीक यांचे डबलबारी भजन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असल्याचे अमृतेश्वर देवालयाचे ट्रस्टी सुरेंद्र शिर्के यांनी भाविक भक्तांना दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

Exit mobile version