बूस्टर डोसच्या संशोधनातून मोठा दिलासा

मृत्यूदर 90 टक्क्यांनी कमी होण्यास मदत
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
संपूर्ण जगात वेगाने पसरणार्‍या कोरानाच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच फायझर लसीचा बूस्टर डोस ओमिक्रॉनच्या व्हेरिएंटवर 90 टक्के प्रभावी असल्याचे दिलासादयाक वृत्त समोर आले आहे. एका संशोधनात ही बाब उघड झाली आहे. शिवाय यामुळे मृत्यूदर 90 टक्क्यांनी कमी होण्यास मदत होईल, असे इस्त्रायलमध्ये केलेल्या संशोधनामध्ये समोर आले आहे.
या अभ्यासात 50 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या व्यक्तींचा समावेश करण्यात आला ज्यांना किमान पाच महिन्यांपूर्वी फायझर लसीचे दोन डोस देण्यात आले होते. असे मद न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनफ मध्ये गुरुवारी प्रकाशित झालेल्या संशोधन अहवालात नमुद करण्यात आले आहे.

Exit mobile version