पनवेल | प्रतिनिधी |
दीपक फर्टिलायझर्स अँड पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेड आणि स्मार्ट केम टेक्नॉलॉजीज लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने तळोजा एमआयडीसी क्षेत्र येथे 34 एकर जागेत निर्माण करणार हरितपट्टा त्याचे वृक्ष पूजन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे विभागीय अधिकारी डी बी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
एमआयडीसीतर्फे दीपक फर्टिलायझर्स यांना 80 गुंठे आणि 16 गुंठे परिक्षेत्राचे दोन भूखंड हरित पट्टा निर्माण करण्याचे कामी प्रदान करण्यात आले आहेत. यापूर्वी दीपक फर्टिलायझर्स च्या माध्यमातून तब्बल अकरा एकर जमिनीवर 9 हजार 700 झाडांचे संगोपन करण्यात आले आहे. तर भविष्यात वनविभागाच्या कडून मिळणारी वीस एकर जमीन हरित पट्ट्या खाली आणण्याचे उद्दिष्ट कंपनीने डोळ्यासमोर ठेवले आहे.
हरितपट्टा निर्माण करण्याच्या उपक्रमाच्या उद्घाटन सोहळ्याला डीआयएसएचचे सहसंचालक विक्रम काटमवार, एमआयडीसी सहाय्यक अभियंता सी.एन.पाटील, पनवेल पं.स.सदस्य काशिनाथ पाटील, टीएमए चे उपाध्यक्ष संदीप डोंगरे, दीपक फर्टिलायझर्स च्या के वन युनिट चे हेड राधेश्याम सिंग, डी बी सिंग, जयश्री काटकर, संतराम चलवड, अरुण शिर्के, संदीप काकडे, नंदकुमार दबडे, दीपक पांडे, नेती,बेल्हेकर आदी मान्यवर उपस्थित होते.







