जलजीवनच्या 28 योजनांना वन विभागाचा ग्रीन सिग्नल

| रायगड | प्रतिनिधी |
जलजीवन योजनेंतर्गत पाणी पुरवठा योजनेसाठी अलिबाग वनविभागाकडे जिल्हा परिषद रायगड यांच्याकडून प्राप्त झालेल्या 26 गावातील व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याकडून प्राप्त झालेल्या 2 गावातील अशा एकूण 28 गावांकरीता पिण्याच्या पाण्यासाठी अलिबाग वनविभागाकडून परवानगी देण्यात आली आहे.

जलजीवन मिशन हा केंद्रशासनाचा महत्वाकांशी कार्यक्रम असून या योजनेंतर्गत गावांना नळ पाणीपुरवठा योजना राबविण्याची आहे. या योजनेंतर्गत वनजमीनीतून पाईपलाईन टाकण्यासाठी परवानगीकरिता, जिल्हा परिषद व महाराष्ट्र जीवन प्राधीकरण यांच्याकडून प्रस्ताव प्राप्त झाले होते. या प्रस्ताव प्रकल्प यंत्रणेकडून परिपूर्ण दस्तऐवज प्राप्त न झाल्याने प्रलंबित होते.

याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड व उपवनसंरक्षक, राहुल पाटील यांनी कार्यशाळेचे आयोजन करुन गटविकास अधिकारी व वन परिक्षेत्र अधिकारी यांना मार्गदर्शन करुन परिपूर्ण प्रस्ताव तयार करुन संबंधित वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्यामार्फत उप वनसंरक्षक अलिबाग यांच्या कार्यालयाकडे सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

उपवनसंरक्षक, अलिबाग राहुल पाटील यांनी उपवनसंरक्षक, अलिबाग या पदावर हजर झाल्यापासून या प्रकरणी सबंधित यत्रणांसोबत सातत्याने पाठपुरावा करुन पिण्याच्या पाण्यासाठी एकूण 28 गावांकरीता मान्यता प्रदान केली आहे.

Exit mobile version