| पनवेल | वार्ताहर |
रोटरी क्लब ऑफ खारघर मिडटाऊन यांच्या मार्गदर्शनाखाली आणि रोटरी क्लब ऑफ नवी मुंबई सनराइज, रोटरी क्लब ऑफ पनवेल महानगर आणि रोटरी क्लब ऑफ पनवेल सनराइज यांच्या सहकार्याने ग्रीन सोसायटी मेळावा, रिजन्सी क्रेस्ट, खारघर इथे आयोजित करण्यात आला.
या मेळाव्याचा उद्देश हरित समाजाची किफायतशीरपणे अंमलबजावणी कस करणे. मुख्य अतिथी माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर आरटीएन डॉ. शैलेश पालेकर, महानगरपालिकेचे उपायुक्त वैभव विधाते, अध्यक्ष आरटीएन शैलेश पटेल, आरटीएन दीपा पटेल आणि आरटीएन केशव ताम्हणकर यांच्या हस्ते ग्रीन मीटचे उद्घाटन करण्यात आले. डॉ. शैलेश पालेकर यांनी उपस्थितांना प्रेरक भाषण केले व हरित समाजाची किफायतशीरपणे अंमलबजावणी कस करणे याची पूर्णपणे माहिती दिली. त्यानंतर उपायुक्त वैभव विधाते त्यांनी पनवेल महानगरपालिकेने विविध हरित पद्धती राबवून दिलेल्या प्रोत्साहनाचा उल्लेख केला. आरटीएन केशव ताम्हणकर यांनीही रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 ने ग्रीन सोसायटी आणि ग्रीन स्कूल बनवण्यासाठी घेतलेल्या पुढाकाराबद्दल थोडक्यात माहिती दिली. हरित सभेनंतर संतोष ललवाणी यांचे सोलर रूफ टॉप, शैलेश देशपांडे-जलसंवर्धन आणि समजुक्ता मोकाशी यांनी सोसायटीद्वारे अवलंबल्या जाणार्या कचरा व्यवस्थापन पद्धती या विषयावर सादरीकरण केले.