दहावीतील गुणवंतांचा भेटवस्तू देऊन सत्कार

। माणगाव । वार्ताहर ।
दहावीच्या परीक्षेत माणगाव तालुक्यातील विघवली विभाग शिक्षण प्रसारक मंडळाच्या विघवली हायस्कूलने उज्ज्वल यशाची परंपरा कायम ठेवली. या हायस्कूलमधील 26 विद्यार्थ्यांपैकी 25 विद्यार्थी उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाले असून, एकूण निकाल 96.15 टक्के लागला आहे. यामध्ये श्रावणी निलेश आडीत 86.80 टक्के, समीक्षा राजेंद्र सालदूर 84.60 टक्के, नेत्रा नरेश बक्कम 79.60 टक्के मिळवून उत्तीर्ण झाली आहे. या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा नुकताच विघवली हायस्कूलमध्ये संस्थेचे अध्यक्ष महादेवराव बक्कम यांच्या प्रमुख उपस्थितीत संस्थेच्या सर्व पदाधिकारी यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.

विघवली हायस्कुलचे स्कुल कमिटी चेअरमन नामदेव शिंदे यांनी दहावीमध्ये दरवर्षी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण होणार्‍या विद्यार्थ्यांसाठी आपले बंधू कै.आदिप शिंदे व पत्नी कै. उषा शिंदे यांच्या स्मरणार्थ प्रत्येकी 15 हजार रुपये प्रमाणे 30 हजार रुपये संस्थेकडे ठेव म्हणून जमा केले असून, यातून दरवर्षी मिळणारा व्याज हे दहावीत प्रथम तीन येणार्‍या विद्यार्थ्यांना बक्षीस म्हणून दिले जाते, अशी माहिती संस्था अध्यक्ष महादेवराव बक्कम यांनी दिली.

याप्रसंगी संस्थेचे सचिव बा.द. बेंडखळे, स्कुल कमिटी चेअरमन नामदेव शिंदे, सदस्य चंद्रकांत उभारे, वसंत साठे, भागोजी ढाकवळ, हेमंत शेट, काशीराम वाढवळ, सहदेव बक्कम, यशवंत बक्कम, विजय धसाडे, नरेश बक्कम यांच्यासह पालकवर्ग, महिला भगिनी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक कृष्णा पानावकर यांनी केले.

Exit mobile version