दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन

| अलिबाग | वार्ताहर |

रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघ आणि स्व. प्रभाकर पाटील सांस्कृतिक कला मंच तसेच प्रभाकर पाटील सार्वजनिक वाचनालय अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने रामनारायण पत्रकार भवनात पत्रकार दिनानिमित्त दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला मंचाचे उपाध्यक्ष तसेच साप्ताहिक कोकणनामाचे सहसंपादक शरद कोरडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी शरद कोरडे यांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या जीवनावर आधारित मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी प्रभाकर पाटील सांस्कृतिक मंचाचे अध्यक्ष सखाराम पवार, ज्येष्ठ नाट्यकर्मी जगदीश नागे, पोलीस पाटील संघटनेचे विकास पाटील, सार्वजनिक वाचनालयाचे ग्रंथपाल भालचंद्र वर्तक, कोमसापचे सहकार्यवाह नंदू तळकर, जिल्हा रुग्णालयाचे हेमकांत सोनार, प्रभाकर पाटील सार्वजनिक वाचनालयाच्या झेबा कुरेशी आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास पाटील यांनी केले, तर उपस्थितांचे आभार जगदीश नागे यांनी मानले.

Exit mobile version