। नागोठणे । वार्ताहर ।
नागोठणे येथील नाभिक समाज बांधवांकडून हुतात्मा विरभाई कोतवाल व हिराजी पाटील यांची 78 वी पुण्यतिथी देशभक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली. नागोठणे येथील भाई टके यांच्या निवासस्थानापासून मशाल मिरवणूक काढण्यात आली.यावेळी हुतात्मा वीर भाई कोतवाल, हिराजी पाटील अमर रहे, भारत माता की जय अशा घोषणा देण्यात आल्या.त्यानंतर नागोठणे ग्रामदैवत श्री जोगेश्वरी माता प्रांगणात मंदिरा समोरील दीपस्तंभावरील दीप पेटवून सलामी देत हुतात्मा भाई कोतवाल व हिराजी पाटील यांना वंदन करण्यात आले. यावेळी भाई टके, उदंड रावकर, विवेक रावकर, रवि टके, सुधाकर निंबाळकर, जगदीश दिवेकर, संतोष माने, सुधाकर टके, मिलिंद गुजर, मनोज गायकवाड, राजू माने, दिपक पवार, संदीप कडू, अभिषेक गुजर आदींसह नाभिक समाज बांधव उपस्थित होते. नागोठणे ग्रामपंचायत व नाभिक समाज बांधवांच्या वतीने हुतात्मा भाई कोतवाल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले. यावेळी उपसरपंच मोहन नागोठणेकर, बापू रावकर, सुरेश गायकवाड, शैलेश रावकर, अॅड. श्रीकांत रावकर, सत्यजित रावकर आदींसह नाभिक समाज बांधव व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.