जासई विद्यालयात कर्मवीरांना अभिवादन

| उरण | वार्ताहर |

रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, शिक्षणमहर्षी, पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 135 व्या जयंती निमित्त श्री. छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि. बा. पाटील ज्युनिअर कॉलेज जासई येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी राजेंद्र साळुंखे, धनाजी क्षीरसागर, चंद्रकांत जाधव, शहाजी फडतरे, अरुण जगे, सुरेश पाटील, नरेश घरत, सरपंच संतोष घरत, विद्यालयाच्या स्थानिक स्कूल कमिटीचे सर्व सदस्य, इतर शिक्षण प्रेमी नागरिक तसेच पालक वर्ग मोठया संख्येने उपस्थित होते.

विद्यालयातील मागील वर्षी इयत्ता दहावी, बारावी मध्ये प्रथम, द्वितीय आलेल्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले. सुरेश पाटील, डी.आर. ठाकूर, अरुण घाग, एस.सी. पाटील यांचा विद्यालयाकरून सत्कार करण्यात आला. विद्यालयातील दहावी ब मधील विद्यार्थिनी तृप्ती मनोहर चाटे हिने अण्णांच्या कार्याची माहिती सांगितली. आभार प्रदर्शन जी.आर म्हात्रे यांनी केले.

Exit mobile version