| अलिबाग | प्रतिनिधी |
संत सेना महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त अलिबाग शहर नाभिक समाज संघटनेच्यावतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या पुण्यतिथीनिमित्त अलिबाग नगरपरिषदेचे वीज व बांधकाम सभापती प्रशांत नाईक यांनी संत सेना महाराज यांना विनम्र अभिवादन केले. यावेळी उपनगराध्यक्षा ॲड. मानसी म्हात्रे तसेच संजना किर यांनीही संत सेना महाराजांना अभिवादन केले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून संत सेना महाराज यांच्या विचारांचे स्मरण करून त्यांच्या सामाजिक आणि आध्यात्मिक कार्याला अभिवादन करण्यात आले. संत सेना महाराजांनी समाजाला दिलेली समता, सेवा, भक्ती आणि बंधुभावाची शिकवण आजही समाजासाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याची गरज असल्याचे यावेळी उपस्थितांनी नमूद केले. अलिबाग शहर नाभिक समाज संघटनेच्यावतीने आयोजित या पुण्यतिथी कार्यक्रमास समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून संत सेना महाराजांच्या आशीर्वादाचा लाभ घेतला.
संत सेना महाराजांना अभिवादन
