। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अलिबागचे थोर तपस्वी रामजी लक्ष्मण घरत यांच्या 167 व्या जयंतीचे औचित्य साधून गुरूवारी (दि.23 जून) सकाळी 10.30 वाजता जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष तसेच रायगड जिल्हा सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष अॅड.गौतम पाटील यांच्या हस्ते त्यांच्या अलिबाग येथील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले. श्रीरंग घरत निमंत्रक, प्रशांत नाईक, मित्रमंडळ, पुतळा सुशोभिकरण समिती यांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आले.
या कार्यक्रमास श्रीरंग घरत, निमंत्रक, नागेश कुलकर्णी, शरद कोरडे, चारूशिला कोरडे, नवीन राऊत, अरविंद घरत, बळवंत वालेकर, भालचंद्र वर्तक, हेमकांत सोनार, जगदिश नागे, मधुकर पाटील, कमळाकर राऊत, संजय कांबळे, सुधाकर राणे, पूजा काठे, साक्षी काठे, बाळू पवार, रमेश नाईक, नाईक (कार्ले), म्हात्रे (चेंढरे), गौरी, सार्वजनिक वाचनालयाचे कर्मचारी आदी उपस्थित होते.







