कर्जत काँग्रेसतर्फे राष्ट्रपित्याला अभिवादन

| कर्जत | प्रतिनिधी |
कर्जत शहर काँग्रेस समितीच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. स्वस्तिक फोटो स्टुडिओमध्ये जेष्ठ कार्यकर्ते सुभाष मदन यांनी गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष धनंजय चाचड, प्रदेश प्रतिनिधी मुकेश सुर्वे, जिल्हा प्रतिनिधी हेमंत देशमुख, शहराध्यक्ष अनंत देवळे, संदीप पाटील, ज्योती जाधव आदी उपस्थित होते.
याप्रसंगी मदन यांनी, फाळणीचा इतिहास सांगून काही लोक वेगळा इतिहास सांगतात मात्र खरी गोष्ट वेगळी आहे. असे स्पष्ट केले. देवळे यांनी, मराहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी नांदेड येथे जायचे आहे. त्याकरिता जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी नावे द्यावीत म्हणजे नियोजन करणे सोपे जाईल असे सूचित केले.

Exit mobile version