ग्रेगोरियन पब्लिक स्कूलचा ऐतिहासिक विजय

सीबीएसई आंतरशालेय कबड्डी स्पर्धेत प्रथम क्रमांक; अंतिम सामना टाय झाल्यानंतर 5-5 रेडमध्ये विजय

| खांब | प्रतिनिधी |

उरण येथे आयोजित सीबीएसई आंतरशालेय कबड्डी स्पर्धा 2026 मध्ये ग्रेगोरियन पब्लिक स्कूल किल्ला रोहाच्या मुलांच्या संघाने उत्कृष्ट सांघिक कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावून ऐतिहासिक विजेतेपद मिळविले.

अनेक वर्षांनंतर ग्रेगोरियन पब्लिक स्कूल रोहा संघाने या स्पर्धेत ऐतिहासिक विजयाची नोंद केली आहे. गेल्या वर्षी याच स्पर्धेत संघाने द्वितीय क्रमांक मिळविला होता. यंदा विजेतेपद मिळविण्यासाठी खेळाडूंनी घेतलेली मेहनत, नियमित सराव आणि उत्कृष्ट संघभावनेचे फलित या विजयातून दिसून आले. अंतिम सामना अत्यंत रोमहर्षक आणि चुरशीचा झाला. ग्रेगोरियन संघाने प्रतिस्पर्धी संघाशी शेवटपर्यंत जोरदार लढत दिल्याने सामना टाय झाला. त्यानंतर नियमानुसार 5-5 रेड घेण्यात आल्या. या निर्णायक टप्प्यात ग्रेगोरियन पब्लिक स्कूल रोहा संघाने दमदार कामगिरी करत विजेतेपदावर आपले नाव कोरले. या ऐतिहासिक यशामध्ये सर्व 12 खेळाडूंची सांघिक कामगिरी महत्त्वाची ठरली. प्रत्येक खेळाडूने आपल्या जबाबदारीचे उत्तम प्रकारे पालन करत संघाच्या विजयासाठी मोलाचे योगदान दिले. संघाचे प्रशिक्षक सुधीर जंगम यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंनी केलेली मेहनत, योग्य प्रशिक्षण आणि नियोजन या विजयामागे महत्त्वाचे ठरले. तसेच प्राचार्य एलेन फादर यांचे विशेष सहकार्य व प्रोत्साहन संघासाठी मोलाचे ठरले.

Exit mobile version