११ हजारांच्या रोख रक्कमेसह खाद्यतेलाच्या पिशव्या पळवल्या
। सांगोला । प्रतिनिधी ।
अज्ञात चोरट्यानी सांगोला शहरातील धनगर गल्ली येथील किराणा दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून दुकानातील रोख रक्कम ११ हजार रुपये व सुमारे ४ हजार ४५० रुपये किंमतीचे अन्य सामान चोरल्याची घटना घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी यांचे सांगोला शहरातील धनगर गल्ली येथे धर्तीगे किरणा स्टोअर्स ५ ऑक्टोबर रोजी फिर्यादी व त्यांचा भाऊ हे रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास दुकान बंद करून घरी गेले होते.
दुसऱ्या दिवशी दिनांक ६ ऑक्टोबर रोजी सकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास फिर्यादी यांचा मुलगा हा दुकान उघडण्यासाठी आला तेव्हा त्याला दुकानाची कुलपे तोडलेली व शटर उघडेले दिसून आले. सदर ठिकाणी जाऊन फिर्यादी यांनी बघितले असता दुकानाच्या गल्ल्यातील ११ हजार रुपये ठेवलेल्या ठिकाणी नव्हते. तसेच सुमारे ४ हजार ४५० रुपये किंमतीचे विविध कंपनीचे खाद्यतेलाचे डब्बे व पिशव्या चोरीस गेल्याचे त्यांना निदर्शनास आले.याप्रकरणी दुकान मालक राजेश धतींगे रा. सनगर गल्ली, सांगोला यांनी अज्ञात चोरट्याविरोधात सांगोला पोलीसात फिर्याद दिली आहे.
चोरांची दिवाळी जोरात
सांगोला शहरातील रहदारीच्या भागातील किराणा दुकान फोडून चोरट्यानी चक्क पाम तेल व इतर कंपनीच्या खाद्यतेलाच्या पिशव्या व डब्बे चोरून नेहले असल्याची घटना घडली आहे. त्यामुळे तोंडावर आलेल्या दिवाळीच्या अगोदर ‘चोरांनी खाद्यतेलावर डल्ला’ मारला असल्याने यंदा ‘चोरांची दिवाळी जोरात’ होणार हे मात्र नक्की .