मुंबई-पुण्यात ओमिक्रॉनचा समूह संसर्ग सुरु

। पुणे । प्रतिनिधी ।
मुंबई आणि पुणे शहरामध्ये कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंटचा प्रादुर्भाव वाढत असल्याचं चित्र आहे. दररोज मोठ्या प्रमाणावर याचे रुग्ण वाढत आहेत. या पार्श्‍वभूमीवर मुंबई आणि पुण्यात ओमिक्रॉनच्या समूह संसर्गाला सुरुवात झाल्याचा दावा, आयसर या संस्थेच्या हवाल्यानं राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी केला आहे.
डॉ. आवटे म्हणाले, आपल्याकडे समुहिकरित्या ओमिक्रॉन विषाणूचा संसर्ग झाल्याचं आयसर या संस्थेच्या प्राथमिक अहवालातून समोर आलं आहे. पण यामधील चांगली गोष्ट अशी आहे की, ओमिक्रॉनचा संसर्ग हा अत्यंत सौम्य स्वरुपात दिसतो आहे. जसं की काल मुंबईत अडीज हजारांहून अधिक रुग्ण आढळले परंतू यामध्ये लक्षण नसलेल्या रुग्णांची संख्या जास्त होती. लक्षणं कमी, रुग्णालयात दाखल होण्याचं प्रमाण कमी तसेच मृत्यूचं प्रमाण कमी असलं तरी हा संसर्ग वाढू नये यासाठी आपण सर्वांनी कोविडसाठी जे अनुरुप वागणं आहे, ते अंगिकारण्याची गरज आहे.

Exit mobile version