| मुंबई | प्रतिनिधी |
मुंबई शहर पश्चिम विरुद्ध औरंगाबाद, परभणी विरुद्ध पिंपरी चिंचवड या पुरुषांच्या सामन्याने 71व्या महाराष्ट्र राज्य कबड्डी असो.च्या राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. बाबुराव चांदेरे सोशल फाउंडेशन व पुणे जिल्हा कबड्डी असो. यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यातील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे दि. 15 ते 20 जुलै या कालावधीत पुरुष व महिला गटाच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पुरूषांचे सामने मॅटच्या 5 क्रीडांगणावर खेळविण्यात येणार आहेत. या स्पर्धेची गटवारी राज्य संघटनेचे सचिव बाबुराव चांदेरे यांनी एका पत्रकाद्वारे सर्व प्रसार माध्यमांना कळविली आहे.
स्पर्धेची गटवारी पुरुष विभाग:-
अ गट :- मुंबई शहर पश्चिम, पालघर, औरंगाबाद.
ब गट :- अहमदनगर, रायगड, सोलापूर, ठाणे.
क गट :- मुंबई उपनगर पूर्व, परभणी, उस्मानाबाद, पिंपरी चिंचवड.
ड गट :- नांदेड, लातूर, बीड, पुणे शहर.
इ गट :- रत्नागिरी, नंदुरबार, जळगाव, नाशिक.
फ गट :- धुळे, ठाणे ग्रामीण, सिंधुदुर्ग, मुंबई उपनगर पश्चिम.
ग गट :- नाशिक शहर, पुणे ग्रामीण, हिंगोली, मुंबई शहर पूर्व.
ह गट :- सांगली, कोल्हापूर, सातारा, जालना.