उदय सामंत यांचा राजा केणींना टोला
| अलिबाग | प्रतिनिधी |
रायगडच्या ग्रामपंचायत निवडणूकीपासून संघटनेत लक्ष घातले आहे. कार्यकर्त्यांची वैयक्तीक कामे झाली नाहीत, याचा अर्थ पालकमंत्र्यांचा संपर्क नाही, असे होऊ शकत नाही, असा टोला शिंदे गटातील राजा केणी यांना पालकमंत्री उदय सामंत यांनी लगावला.
राजा केणी जिल्हा प्रमुख म्हणून काम करतात. म्हणून त्यांनी माझ्याविरोधात भावना व्यक्त केली असेल. यापूर्वीच्या पालकमंत्र्यांच्या तुलनेत कितीतरी पटीने रायगडमध्ये जाऊन जिल्ह्याची पाहणी केली आहे. एका पदाधिकाऱ्याचा काही गैरसमज झाला असेल, तर जिल्ह्याचा पालक म्हणून तो दुर करण्याचा प्रयत्न करेन. परंतु वैयक्तीक काम झाले नाही, याचा अर्थ निधी दिला नाही, असे होऊ शकत नाही. जे आमदार, संघटनेचे पदाधिकारी निधी मागतात, त्यांना पालकमंत्री म्हणून निधी दिला जातो. राजा केणी यांनी व्यक्त केलेल्या भावनांबाबत त्यांच्यासोबत चर्चा करेन.
राजा केणी यांनी अशा पध्दतीचे कोणतेही वक्तव्य केले नाही, कुणीतरी जाणीवपूर्वक असे सांगत असल्याचे आ. महेंंद्र दळवी यांनी सांगितले, असल्याचे सामंत यांनी सांगितले. यावरुन दळवींनी राजा केणी यांच्या वक्तव्यावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले.