नांदगाव विद्यालयात मार्गदर्शन शिबीर

| पाली/गोमाशी | वार्ताहर |

संत नामदेव माध्यमिक विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय नांदगाव येथे सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ ठाणे आणि टाटा कॅपिटल यांच्या वतीने मंगळवारी (दि.30) नांदगाव विद्यालयात विद्यार्थ्यांना शैक्षणिक करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या मार्गदर्शन शिबिरात विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमता विकसित करण्यासाठी काही तंत्रे सांगण्यात आली. तसेच प्रात्यक्षिक दाखवुन साध्या सोप्या पद्धतीने विद्यार्थ्यांना परीक्षेला सामोरे जाताना उपयोगी पडतील अशा संकल्पना स्पष्ट केल्या. विद्यार्थ्यांनी करिअर आधी निश्चित केल्यानंतर त्या दिशेने प्रवास करने सोपे जाते, त्यामुळे ते विद्यार्थी यशस्वी होतात असे हरिश्चंद्र शिंपी यांनी मार्गदर्शन करिताना सांगितले.

सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ ठाणे अध्यक्ष विठ्ठल घाडगे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत असताना शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना करिअर निवडीतील समस्या दूर होऊन योग्य दिशेने वाटचाल करण्यास मदत होत असल्याचे सांगितले. त्याचबरोबर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करून आपले उज्वल भविष्य घडविण्यात करिअर मार्गदर्शन शिबीर उपयोगी ठरतात असे सांगितले. यावेळी नांदगाव महाविद्यालयाचे प्राचार्य संभाजी ढोपे, हरिश्चंद्र शिंपी, सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ ठाणे अध्यक्ष विठ्ठल घाडगे शिक्षक वृंद आदी मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version