हातखंबा, चांदेराई येथे आशा सेविकांना मार्गदर्शन

। रत्नागिरी । प्रतिनिधी ।

रत्नागिरी येथील वीरश्री ट्रस्ट आणि धन्वंतरी रुग्णालयातील रत्नागिरी टेस्ट ट्यूब बेबी सेंटरच्या माध्यमातून हातखंबा प्राथमिक आरोग्यकेंद्र आणि चांदेराई प्राथमिक आरोग्यकेंद्रात आशा सेविकांचे मार्गदर्शन शिबिर झाले. या वेळेला आशा सेविकांना आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले.

वीरश्री ट्रस्ट आणि धन्वंतरी रुग्णालय सातत्याने रत्नागिरीतील आरोग्यविषयक क्षेत्रामध्ये काम करत आहे. याचाच एक भाग म्हणून गावातल्या घराघरात पोहोचणार्‍या आशा सेविकांना आरोग्यविषयक अत्याधुनिक माहिती देण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हातखंबा प्राथमिक आरोग्यकेंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रियांका माने, आरोग्य सहाय्यक झोरे, आरोग्य सहाय्यिका देसाई, आशा पवार, गटप्रवर्तक तन्वी बोरकर आणि सायली शेट्ये उपस्थित होते.

आशा सेविकांना विविध विषयांवर तसेच वंध्यत्व या विषयावर आवर्जून मार्गदर्शन करण्यात आले. तसेच, चांदेराई प्राथमिक आरोग्यकेंद्र येथेसुद्धा आशा सेविका मार्गदर्शन शिबीर घेण्यात आले.

Exit mobile version