‘जीवनधारा’कडून विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबीर

| खांब | वार्ताहर |

सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून गेली अनेक समाजात कार्य करणार्‍या जीवनधारा संस्था कोलाड येथे निर्मला निकेतन कॉलेज ऑफ मुंबई होम सायन्स डिपार्टमेंट हेल्थ अँड न्युट्रिशनच्या विद्यार्थ्यांचे तीन दिवसीय शिबीर मोठ्या उत्साहात पार पडले.

या शिबिरासाठी 23 विद्यार्थी आणि त्यांचे प्रोफेसर डॉ. शीतल मॅडम व डॉ. नेहा मॅडम उपस्थित होते. त्यांचे जीवनधारा संस्थेमार्फत स्वागत करण्यात आले. जीवनधारा संस्थेच्या कार्यकर्त्यांनी संस्थेची ओळख व संस्थेमार्फत कोणकोणती कामे केली जातात याची माहिती देण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांनी जीवनधारा संस्थेतील सर्व कर्मचारी व वाडीतील महिलांना पथनाट्याद्वारे पोषण आहाराची माहिती व कुपोषणाविषयी माहिती दिली. तसेच आहाराविषयी माहिती सांगून पौष्टिक आहार कोणता घ्यावा ते प्रात्यक्षिक करून दाखवले.

कोलाडवाडी, गारभट, खरबाची वाडी या तीन वाड्यांमध्ये जाऊन येथेही विद्यार्थ्यांनी आरोग्य व न्यूट्रिशन यावर पथनाट्य सादर करून वाडीतील लोकांना पोषण आहार व कुपोषण याविषयी जनजागृती केली. अशाप्रकारे तीन दिवसांच्या या शिबिरात विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर अभ्यास केला. तसेच प्रबोधनाबाबत कार्य केले. सर्व उपक्रमांबद्दल विद्यार्थी वर्गाने जीवनधारा संस्था व हिल्डा फर्नांडिस आणि त्यांच्या सर्व स्टाफचे आभार मानण्यात आले.

Exit mobile version