शेतकऱ्यांना कीड नियंत्रण व्यवस्थापनाविषयी मार्गदर्शन

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांना सतावत असलेल्या पिकांवरील विविध प्रकारचे कीड यांचा प्रतिबंध करण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणारे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात तालुक्यातील 350 हुन अधिक शेतकऱ्यांना शेती साहित्याचे वाटप करण्यात आले. नागपूर येथील हिल इंडिया लिमिटेड आणि रायगड जिल्हा किसान क्रांती संघटना यांच्या माध्यमातून या शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

तालुक्यातील नेरळ येथील हुतात्मा हिराजी पाटील सामाजिक सभागृह येथे शेतकरी प्रशिक्षण आणि सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. या शेतकरी मेळाव्याचे उदघाटन किसान क्रांती संघटनेचे संस्थापक टी.एस. देशमुख, डॉ. सतीश ढोके, वंदना शिंदे, सुशांत पाटील, उत्तम शेळके, डी. डी. सोनवणे, राजाराम शिंदे, सुनील निंबाळकर, बुद्धभूषण मुनेश्वर, महेश विरले, शिवनाथ बाबा आदी मान्यवर उपस्थित होते. शेतकरी मेळाव्यात उपस्थित असलेल्या 350 हुन अधिक शेतकऱ्यांना शेती पूरक साहित्याचे वाटप करण्यात आले. कृषी विस्तार शिक्षण शास्त्रज्ञ डॉ. रवींद्र मर्दाने, मंडळ कृषी अधिकारी कर्जत दिनेशकुमार कोळी, पद्मावती गायकवाड, प्रमिला मसराम, चंद्रकांत मिस्तरी, प्रमोद बागडे आदीनी शेतकऱ्यांना मागर्दशन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रामदास माळी, भाऊ खानविलकर, शरद तवले, अनिल गवळे, सचिव एकनाथ शेळके, रवींद्र जाधव, सुरेश राणे, काशिनाथ धुळे, पंढरीनाथ दाभाडे, साधुरं पाटील, सुरेश जाधव, अरुण शेळके मदत केली.

Exit mobile version