। पनवेल । प्रतिनिधी ।
पनवेल तालुक्यातील आजिवली येथे जनता विद्यामंदिरात नवीन पनवेल वाहतूक शाखेच्या वतीने वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत विद्यार्थ्यांना प्रबोधन करण्यात आले.
जनता विद्यामंदिर, अजिवली, ता. पनवेल येथे नवीन पनवेल वाहतूक शाखेच्या वतीने विद्यार्थी यांना वाहतूक नियमाची माहिती देऊन नियमाचे पालन करण्याबाबत प्रबोधन करण्यात आले. यावेळी त्यांना गाडी चालवताना सीट बेल्ट लावणे, दारू पिऊन गाडी चालवू नये, लेन कटिंग करू नये, वाहन चालवताना मोबाइल फोनचा वापर करू नये, उलट्या दिशेने वाहने चालवू नयेत, वाहने रोडवर पार्क करू नयेत, विद्यार्थी तसेच विद्यार्थिनी यांनी लायसन्स येत नाही तोपर्यंत कोणताही वाहन चालू नये तसेच सर्व वाहतुकीचे नियम आपल्या पालकांना समजावून सांगणे असे विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात आले.
तसेच, वाढत्या सायबर गुन्हेगारीबद्दल माहिती देऊन इंटरनेट वापरताना घ्यावयाची काळजी, सायबर गुन्हे आणि प्रकार, मोबाईल वापरताना घ्यावयाची काळजी, सायबर हेल्पलाइन 1930, लैंगिक अपराधापासून बालकाचे संरक्षण संरक्षण (POCSO) कायदा, बालविवाह कायदा आणि बालविवाहाचे दुषपरिणाम याबद्दल माहिती देऊन बालविवाह होऊ नयेत, असे आवाहन केले. तसेच पोलीस मदतीची आवश्यकता असल्यास 112 या पोलीस हेल्पलाइन बद्दलची माहिती वपोनि प्रकाश सकपाळ, पोहवा संजय गावडे यांनी दिली. यावेळी 160 विद्यार्थी आणि शिक्षकवर्ग उपस्थित होते.
वाहतूक नियमांबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
