‘तिमिरातूनी तेजाकडे’ स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन

। खोपोली । प्रतिनिधी ।

कला, क्रीडा, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या आर्यन फ्रेंड्स फाऊंडेशनच्यावतीने ‘तिमिरातून तेजाकडे’ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन वडवळ येथील श्री शिव छत्रपती सभागृहात करण्यात आले होते. या कार्यक्रमाला शंभरहुन अधिक विद्यार्थी उपस्थित होते.

ग्रामीण भागातील मुलांना अश्या प्रकारचे मार्गदर्शन पहिल्यांदाच होत असल्याने विद्यार्थी, पालक तसेच उपस्थित मान्यवरांनी आर्यन्स फ्रेंडस फाऊंडेशनचे अध्यक्ष जगदीश मरागजे तसेच कार्यकारिणी पदाधिकारी महेंद्र सावंत, सुधीर मुसळे, प्रमोद सावंत, प्रवीण सावंत, मंगेश सावंत, सागर मोरे व उपक्रम प्रमुख सचिन जाधव यांचे कौतुक केले. यावेळी अखिल कोयना पुनर्वसन सेवा संघ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष विठ्ठल मोरे, सरपंच ज्ञानेश्‍वर सुतार, श्यामकांत सावंत, एम.डी. चाळके, जितेंद्र सकपाळ, विष्णू सावंत, सुरेश चाळके, संजय कदम, जगदीश मरागजे, प्रमोद पाटील, वैशाली गोळे, सुधाकर थळे आदी मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version