नांदगाव मधील महिलांना मार्गदर्शन

। मुरूड-जंजिरा । वार्ताहर ।

राज्यातील महिलांचे संरक्षण व त्यांच्या प्रगतीसाठी महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेंतर्गत या योजनेची माहिती देणे तसेच गावातील गोरगरीब महिलांना या योजनेचा जास्तीत जास्त फायदा मिळवून देण्यासाठी नांदगावच्या सरपंच सेजल घुमकर यांनी विशेष प्रयत्न सुरू केले असून त्याकरिता महिलांनामार्गदर्शन व अर्ज भरणे कार्यक्रमाचे आयोजन नांदगावमध्ये करण्यात आले होते. नांदगाव ग्रामपंचायत सभागृह, माळी समाज सभागृह, तसेच नागेश्‍वर नगर येथे महिलांच्या सभा घेऊन उपस्थित महिलांना मार्गदर्शनाबरोबरच काही महिलांचे प्रत्यक्ष अर्ज देखील भरण्यात आले. यावेळी उपसरपंच मेघा मापगावकर, मंजुम घोले, वृषाली रणदिवे, वैशाली वाघमारे, अंगणवाडी सेविका पल्लवी ठाकुर, मेघना ठोंबरे, रिद्धी मळेकर, रावजी पाटील, रचना कवळे आदी उपस्थित होत्या.

Exit mobile version